कलियुगात
सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते.
मनुष्याची धडपड जास्तीतजास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते. याकरता प्रत्येक जण
पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख
उपभोगण्याचा प्रयत्न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट
प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद
हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. ते आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट
म्हणजे ‘अध्यात्म’ अध्यात्माचे इतके
महत्त्व असतांना खेदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च आनंद
आणि सर्वज्ञता देणार्या या विषयाकडे फारच थोडे जण वळतात. विषयसुखाच्या अनंतपटीने
आनंद असतो, हे कळले तर विषयसुखापेक्षा
आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करील. असे प्रयत्न व्हावेत, हाच उद्देश मनात ठेवून हा लेख लिहिला आहे !
//
श्री सिध्दनाथ कुलाचार,पूजा,नैवद्य ,नवस आणि कौल विषयक माहिती //
*श्री क्षेत्र खरसुंडीस आल्यावर देव देव कसा करावा :-
श्री क्षेत्र खरसुंडी हे महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश आदी भाविकभक्तांचे श्रद्धास्थान
आहे.संपूर्ण राष्ट्रांमध्ये कुलस्वामी म्हणून
प्रसिद्ध असे खरसुंडसिद्धाचे मंदिर आहे.आपले पूर्वज महिन्यातून एकवेळ खरसुंडीस येत
असे.
मात्र हल्लीच्या ह्या युगामध्ये आपणास ते शक्य होत नाही.
त्यामुळे आपण वर्षातून एकवेळ तरी आपण आपल्या कुलस्वामीस आलेच पाहिजे . खरसुंडीस आल्यानंतर पहाटे घोडेखुरमध्ये स्नान करून तेथील
देवांचे दर्शन घेऊन आपल्या पूज्याऱ्यांच्या घरी जाऊन पुजाऱ्यांना देवाच्या
नैवैद्यासाठी कोरडा शीदा म्हणून डाळ,गुळ,तेल,तांदूळ,पीठ असा कोरडा शिदा
द्यावा. व भांग बनवण्यासाठी इच्छुक दक्षिणा द्यावी.त्यानंतर पुजाऱ्यासोबत
दर्शनासाठी जावे व देवदर्शन करावे.देवदर्शन झाल्यानंतर देवाचा प्रसाद म्हणून भोजन
करावे व पुजाऱ्याना त्यांची दक्षिणा द्यावी आणि आपल्या गावी मार्गस्थ व्हावे.
*
देवास करण्यात येणारा नैवद्य :-
श्री सिध्दनाथ हे शंकरांचा अवतार आहेत. देवास नैवद्य
म्हणून पुरणपोळी अथवा भाजीभाकरी,भात,शिरा,आमटी,या पदार्थांचा
नैवद्य दाखवला जातो. ह्याच्या जोडीला भंगीचा नैवैद्य सुधा दाखवला जातो.
*
महानैवेद्य :-
भाविकभक्तानो अन्नदाणासारखे पुण्याचे दान नाही. तर
महानैवेद्य म्हणजे अन्नदान होय. खरसुंडीमध्ये देवांचे सेवा करणारे १२ सेवेकरी आहेत
देवासाठी अंघोळीला पाणी आणणे, मंदिर लोटाने,
मंदिराची स्वच्छता राखणे,पुजाऱ्यांची कपडे
धुणे, व अन्य बरीचशी कामे हि सेवेकरी मंडळी करत
असतात.भक्तांनो सांगायचे तात्पर्य एवढेच कि हे सेवेकरी कोणत्याही प्रकारचे मूल्य न
घेता देवाची प्रामाणिकपणे सेवा करत असतात.तर प्रश्न पडतो हे सेवेकरी आपल्या
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करतात.तर तुम्ही जे अन्नदान करता त्यावरच हे सेवेकरी
जगात असतात.
*
महानैवेद्य कसा करावा :-
महानैवद्यासाठी लागनारे साहित्य आपण आपल्या पुजाऱ्यांकडून
माहिती करून घ्यावे. व त्यानुसार नैवद्य करावा.
*
महानैवेद्य केव्हा व कोणत्या कारणासाठी करावा :-
१) जर भाविक भक्तांनो तुम्ही देवांच्या पाच पौर्णिमा
केल्या असतील तर त्या पूर्ण झाल्यानंतर महानैवेद्य करावा.
२) जर आपण वर्षातून एकदा देवासाठी येत असो तर वर्षातून
एकदा महानैवेद्य करावा.
३) आपल्या घरी शुभकार्य असेल तर ते झाल्यानंतर महानैवेद्य
करावा
४) आपल्या कुटुंबाच्या सुख समाधानासाठी महानैवेद्य करावा.
*
देवास करण्यात येणारे अभिषेख ( प्रथम ) :-
देवास सकाळी ७ ते ८.४५ ह्या वेळेमध्ये अभिषेख करण्यात
येतो.
हा अभिषेख दररोज करण्यात येतो कोणत्याही शुभकार्याच्या
निमिताने किवा जन्मदिनी,वास्तुशांती,जावळ प्रसंगी आपण अभिषेख करावा.
*कोणत्याही प्रकारच्या प्रापंचिक अडचणी येत असतील तर अभिषेख करावा.
*मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा अभिषेक केला जातो
*
देवास करण्यात येणार महाभिषेख ( द्वितीय ) :-
"
संध्याकाळी ९ ते १० ह्या वेळेमध्ये करण्यात येणाऱ्या अभिषेखास
महाअभिषेक म्हणतात "
*
महाभिषेकास लागणारे साहित्य :-
दही,दूध,केळी,साखर,अगरबत्ती,धूप,मध,लिंबू,
आपल्या ऐच्छिक समाधानासाठी किंवा वरील सर्व कारणासाठी हा
अभिषेक केला जाऊ शकतो.
(
जर अभिषेखच्या वेळी तुम्हास थांबणे शक्य नसल्यास आपापल्या
पुजाऱ्यांकडे अभिषेकाची दक्षिणा द्यावी व अभिषेख करून घ्यावा )
*
देवास करण्यात येणारी नवसे :-
"
प्रत्येकाच्या आयुष्यात जसे सुखाचे क्षण येतात तसेच अनेक संकटे
सुद्धा येतात तेव्हा आपण देवांचा धावा घेतो व देवास नवस बोलतो "
कुणी देवास घोडा घालतात, तर कोणी घंटी, काहीजण मंदिरात आरसा देतात, तर काहीजण देवास नारळाचे तोरण बांधतात.देवास पैश्याने अंघोळ सुद्धा घालतात
, काहीजण आपले नवस सोन्याच्या दानाद्वारे फेडतात.काहीजण
चांदी दान करतात
अश्या भरपूर प्रकारे नवस फेडली जातात
* श्री नाथांचा पोशाख ( आहेर ) :-
घरात एखादे शुभकार्य संपन्न झाल्यावरती श्री नाथांना
पोशाख केला जातो तसेच महानैवद्यासोबत सुद्धा आहेर दिला जाऊ शकतो. किव्हा आपण स्वइच्छेने
सुद्धा देवास आहेर करू शकतो
पोषाखासाठी लागणारे साहित्य :-
धोतर, पांढरे ५ मीटर
सुती कापड, फेटा , उपरणे , देवीसाठी सहावारी / नऊ वारी साडी चोळी , दोन नारळ (
केसरवाले ) ओटीचे साहित्य इत्यादी.
*
श्री सिध्दनाथांस लावण्यात येणाऱ्या कौल विषयक माहिती :-
जसे सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात तसेच कित्येकवेळा
आपल्यावर संकटेसुद्धा आपल्यावर येतात.
अश्यावेळी आपल्या मनात कित्येक प्रश्न येतात अश्या
बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे कौलमार्फत सोडवली जाऊ शकतात तरी आपल्या मनात कोणतेही
प्रश असतील आणि निर्णय घेताना असे मनात येते कि आपला हा निर्णय चुकीचा तरी नाही ना
तर अश्या वेळी आपण देवास कौल लावू शकता.
आपण आपल्या पुजाऱ्यांमार्फत देवास कौल लावू शकता किव्हा
मला व्हाट्स अँप करू शकता नकीच आपण ह्या प्रश्नातून मुक्त होऊ शकता .
*
कौल कधी आणि कोणत्या दिवशी लावला जातो याविषयी थोडक्यात माहिती :-
कौल सकाळी ५ : ३० ते ६ : ४५ पर्यंत असतो
मंगळवार, बुधवार ,गुरुवार, शुक्रवार ,ह्या दिवशी
कौल घेतला जातो
पौर्णिमा आणि अमावश्या ह्या दिवशी कौल बंद असतो.
तरी वरील सर्व माहिती आपणास कशी वाटली हे मला जरूर कळवा
त्यासाठी माझा व्हाट्स अँप नंबर आहे ९७६६००९६९७ भाविकभक्तहो जर आपल्या मनात वरील माहितीविषयी काही शंका असतील तरी मला
जरूर कळवा मी आपणास मदत करण्यास सदैव्य तत्पर आहे,
आपला नम्र
प्रवीण जरंडकर (पुजारी)
(
९७६६००९६९७)