Friday, 26 March 2021

श्री सिध्दनाथ स्तोत्र

 

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कुलस्वामिंना कुठेतरी विसरत चाललो आहे असे आपणास वाटत नाही का ? श्रींचे दररोज स्मरण झालेच पाहिजे पूर्वीच्या काळी जसे ऋषीमुनी देवांचे नामस्मरण करत होते व देव त्यांच्यावर प्रसन्न होईन त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करत असे. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आपणही आपल्या नाथांचे नामस्मरण केले पाहिजे प्रत्येकाच्या मागे काहीना काही संकट जरूर असतात त्यावेळी आपण देवांना स्मरण करतो. इतर दिवशी आपण आपल्या देवास अजिबात स्मरण करत नाही. माझे फक्त एवढेच सांगणे आहे कि आपण आपल्या दिवसातील फक्त दोन मिनिटे नाथांसाठी देऊ शकता का ?

जर देऊ शकत असाल तर नक्कीच आपले कल्याण होईल कारण मी आज आपल्यासाठी श्री सिध्दनाथ स्तोत्र लिहित आहे, हे स्तोत्र आपण रोज म्हणल्यास आपल्यास नक्कीच लाभ होईल, आपल्यावरील संकटे नक्कीच कमी होतील प्रत्येक कामात आपणास नक्कीच यश येईल तरी रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर श्रींच्या फोटोचे दर्शन घेऊन हे स्तोत्र भक्तिभावाने वाचावे निश्चितच आपले कल्याण होईल. 

 

 

श्री सिध्दनाथ स्तोत्र 

 

रविवार पोर्णिमा दिवशी ,भक्त येती देवासी

शरण येती भैरवाशी लीन चरणी भैरवाच्या

भैरव प्रसन्ना झाला ज्याला सदैव लक्ष्मी नांदे घराला

सकाळ सिद्धी लाभती दिर्घयुशी हो संतती

शत्रूमय चोरभय ,समूळ नष्ट होय भक्तीने

वैभव शिकारी चडे  भक्त यश संपत्तीमिळे खूप

भैरव भक्त न पडे चिंता साद सुख कारका

जयसि नाही संतान भैरव प्रसादे होई छान

पिशाच्च भूत बाधा काधिन बाधे भक्ताला

सर्प भय ज्याला भैरव प्रसादे भय रहित जाहला

आनंद अपराधाची कोडी भैरव तुझी तूच सोडावी

मनीची शुद्धी जाहली ,काणवे भैरवाची गाईली

स्त्री वा पुरुष भजोन ,पुण्य पदरी घ्यावे   

No comments:

Post a Comment