Friday, 26 March 2021

श्री सिध्दनाथांच्या साप्ताहिक पूजा

 

           श्री सिध्दनाथांच्या साप्ताहिक पूजा

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री  “ सिद्धनाथ ’’ यांच्या साप्ताहिक पूजा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. श्री नाथ व योगेश्वरी यांच्या मूर्तींवर दररोज वेगवेगळ्या वेशभूषेत पूजा करण्यात येत असते. ह्या पुजेचे वैशिष्ट म्हणजे कोठेही गाठ न मारता फक्त कापडांचा वापर करून श्रींची विविध रुपात पूजा केली जाते. खरसुंडी गावातील पुजारी मंडळी नाथांची विविध स्वरुपात पूजा करण्यात माहीर आहेत. भल्या पाहाटे श्रींच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते त्यानंतर देवांस कौल लावला जातो व त्यानंतर श्रींची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते. दररोज श्रींची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करण्यात येते पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. ह्या पूजा अश्या प्रकारे बांधल्या जातात कि बघणार्याच्या डोळ्याचे पारणे फिटले जाते.

सोमवार – सोमवारी श्रीची पूजा गोसावी या वेशात असते. अंगावरती भगवी शाल पांघरलेली असते. हातात कमंडलू असते गळ्यात रुद्राक्षांची माळ असते शेजारी ढाल , तलवार ,ठेवलेली असते गळ्यात फुलांचा हार असतो एकंदरीतच सोमवारची पूजा हि गोसावी वेशात असते

मंगळवार – मंगळवारी श्रींची खडी (उभी) पूजा बांधण्यात येते. पायामध्ये खडाव जोड घालण्यात येतात धोतर,तोडे,वाळे,हातात तलवार,कमरेला पट्टा,कडेला त्रिशूल,शिंगी,शैली,मनगटया,कानात कुंडले डोक्यावर मुकुट अथवा फेटा त्यावर फुलांचा तुरा असा राजेशाही थाट असतो अर्थातच मंगळवारची पूजा हि नयनरम्य अशी पूजा असते.

बुधवार -  बुधवारी श्री हात्तींवर असतात ह्या पूजेला गजारूढ पूजा म्हणतात.

गुरुवार -  गुरुवारी श्रींच्या पूजेसाठी सिंह हा प्राणी वापरला जातो सिंहावर आरूढ अशी पूजा बांधली जाते.

शुक्रवार -  ह्या दिवशी श्रींच्या पूजेसाठी शेष नाग वापरतात. नाथ शुक्रवारी शेषावर (नाग ) आरूढ असतात.

शनिवार – शनिवारी श्रींची पूजा घोड्यावर (अश्वारूढ) असते. घोडा हे श्रींचे सर्वात आवडीचे वाहन त्यामुळे श्रींची पूजा हि शनिवारी घोड्यावर असते

रविवारी – देवांचा वार रविवार नाथांची रविवारी खास पद्धतीने पूजा बांधण्यात येते या दिवशी श्री गादीवर विराजमान असतात भरपूर अशी दागिने परिधान केलेली असतात. गळ्यात वाघनख्या असतात. अश्याप्रकारे देवांचा रविवारी राजेशाही थाट असतो

      अश्याप्रकारे नाथांच्या आठवड्यात विविध प्रकारच्या पूजा करण्यात येतात संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही अश्या प्रकारची पूजा आपणास पहावयास मिळणार नाहित.

 पूजा करणारे पुजारी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

श्री क्षेत्र खरसुंडी सिध्दनाथांची पूजा हि संपूर्ण जगात प्रसिद्ध अशी पूजा आहे. ह्या पूजेचे वैशिष्ट म्हणजे हि पूजा करताना कोठेही कापडाला गाठ बांधली जात नाही.देवांची पूजा करण्यात प्रमोद पाटील ( पुजारी ) यांचा मोलाचा वाटा आहे. हे नित्य नियमाने व भक्तिभावाने देवाच्या चरणापाशी लीन होऊन देवाची मनोभावी पूजा करत असतात. त्यांच्यावर नाथांचे वरदान असल्यामुळे त्यांच्याकडून अनेकवेळा देव नाथ पूजा बांधून घेत असतात ते पूजेसाठी कोणाकडूनही कोणतेच मूल्य घेत नाहीत जसे नायबा गवळी देवांची सेवा करत असे त्याचप्रमाणे हेदेखील देवाची सेवा करत आहेत त्यांच्याकडून अशीच सेवा घडत रहावी हीच त्यांची इच्छा आहे

       आपणास वरील लेख कसा वाटला हे मला जरूर कळवा

मो – ९७६६००९६९७

EMAIL ID –jarandkar@gmail.com

    

No comments:

Post a Comment