Friday, 26 March 2021

" श्री क्षेत्र खरसुंडीतील वार्षिक उत्सवाच्या तिथी "

 

  " श्री क्षेत्र खरसुंडीतील वार्षिक उत्सवाच्या तिथी "

·      चैत्र शुध्द रामनवमी :- विवाह सोहळ्यासाठी तेल व हळद लावणे

·      चैत्र वद्य अष्टमी :- जोगेश्वरी मंदिरात सायंकाळी पाच वाजता श्री नाथ जोगेश्वरी विवाहसोहळा

·      चैत्र वद्य द्वादशी :- श्रींचा सासनकाठी व पालखी सोहळा व चैत्र यात्रेचा मुख्य दिवस

·      अश्विन शुध्द प्रतिपदा :- घटस्थापना

·      विजयादशमी :- विजयादशमीच्या आदल्या रात्री श्रींच्या पालखीचे जोगेश्वरी मंदिरात वास्तव्यासाठी आगमन व विजयादशमीस साखरवाटप

·      अश्विन शुध्द त्रयोदशी :- श्रींची पालखी देव सिमोलांघानासाठी चिंचाळे हद्दीकडे रवाना.तेथे साखर वाटप दोरीचा खेळ व सायंकाळी नगरप्रदिक्षनेस सुरुवात व मध्यरात्री मुख्य मंदिरात पालखीचे आगमन

·      कार्तिक वद्य अष्टमी :- कार्तिक वद्य अष्टमीला रात्री १२;३० ला श्रीचा जन्मकाळ (फुले पडणे) मध्यरात्री शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम.दुसर्या दिवशी दिंडी व महाप्रसादाचे आयोजन

·      पौष शुध्द त्रयोदशी :- अधिक मासीय वर्षात पौष शुध्द त्रयोदशीस श्रीची जकाई भेट,नेलकरंजी येथे भव्य स्वागत मानपान व जकाई दरीतील यात्रा

·      पौष पोर्णिमा :- श्रीचे क्षेत्र काशीस प्रस्तान. जोगेश्वरी मंदिरापर्यंत पालखीची मिरवणूक

·      माघ पोर्णिमा :- श्रींचे काशीहून आगमन व पारधी पोर्णिमा उत्सव.श्रीची जोगेश्वरी मंदिरापर्यंत मिरवणूक ,दुसर्या दिवशी पारध वाटप      

No comments:

Post a Comment